गल्ल्यांमधून शोधून आणले गेले श्वान
मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्हय़ात एका अजब भंडाऱयाचे आयोजन झाले आहे. या भंडाऱयाचे आयोजन भटक्या श्वानांसाठी करण्यात आले होते. यात भागातील शेकडो भटक्या श्वानांनी भाग घेतला आहे. महाराजपूर तालुक्यातील बिकौरा गावात हा भंडारा आयोजित करण्यात आला होता. आता या अनोख्या भंडाऱयाची चर्चा पूर्ण जिल्हय़ात होत आहे.
मुक्या प्राण्यांना आणि विशेषकरून भटक्या श्वानांना कुणीच खाऊ घालत नाही तसेच त्यांची देखरेख कुणी करत नाही. याचमुळे अशाप्रकारच्या भंडाऱयाचे आयोजन केले असे विधान आयोजक घनश्याम पटेल यांनी केले आहे.
मेजवानीसाठी होर्डिंग
घनश्याम पटेल यांनी श्वानांच्या या मेजवानीसाठी रितसर एक होर्डिंगही तयार केले, ज्यात स्वतःचे तसेच पत्नीचे छायाचित्रही झळकविले आहे. आगामी काळातही अशाप्रकारच्या भंडाऱयाचे आयोजन करत राहणार असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.
चर्चेतील मेजवानी
घनश्याम पटेल यांचा हा भंडारा आता चचेंत आहे. यापूर्वी कुणीच भटक्या श्वानांसाठी अशाप्रकारचे सामूहिक भोजन आयोजित केले नवहते. तसेच या श्वानांसाठी रोटी, पूरी आणि हलवा तयार करण्यात आला होता.