09.02.2022
मूलांक 4- रहस्यमयी राहुचा अंक । मनाने कधी राजा कधी रंक । दुसऱयाकडून कामे करावयाचा रंग । खास आहे तुमचा ।। साम, दाम, दंड, भेद । तुमची नीती ना खंत ना खेद। वाईट विचारांचा भेद। मनी येऊ न द्यावा।। व्यापाऱयांनी असावे सावध। दुसरे बनवतील सावज। चुकू न द्यावा वेध । निर्णयांचा ।। जुलै ते ऑक्टोबर। मतभेदांना न द्यावा थार। इच्छुकांना नोकरीत बदल। या वषी संभवतो।। वैवाहितांनी नाते सुखकर। व्यसनांना सारुनी दूर । यत्नपूर्वक करावे।।
मूलांक 5- बुधाचा हात तुमच्या वरी। राज्य तुमचेच या वर्षावरी। तुमची खास कृपा मित्रांवरी । असते सर्वकाळ सर्वदा ।। थोडे स्वार्थी थोडे मिश्किल । तुम्ही मनाने अवखळ । व्यापार वाढीकडे कल। या वषी असेल।। सही करताना सावधान। कागदपत्री चूक मोठी लहान । या उपरी समाजी मान । या वषी मिळेल।। यावषी खर्चावर लगाम । करा गुंतवणुकीचे काम । नोकरीत कष्ट आणि आराम । योजनेने करावा ।। प्रेमात धोका न द्यावा । राग, मतभेद आवरावा। त्वचा विकार सांभाळावा । यावषी।।
मूलांक 6- शुक्राचाच अंमल अन् शुक्राचेच साल । प्रेमी तुम्ही तुम्हा कला बहाल । सौंदर्यदृष्टीचा महाल । फिका पडतो तुमच्या पुढे ।। भौतिक सुख विपुल धन। लगेच रुसते तुमचे मन । मौजमजेचे खूप क्षण । या वषी मिळतील ।। नोकरी व्यापारात प्रगती । सल्ला घेऊनच चालवावी मती। वरि÷ांची सुसंगती। लाभेल मित्रहो ।। धनावाचून अडकलेली कामे । पूर्ण होतील सहजपणे । खर्चाचा हात आवरणे । इतके मात्र करावे ।। प्रवास होईल, साथी मिळेल । विसाव्यात मन खुलेल । योग, ध्यान व्यायाम । तब्येतीसाठी करावा ।।
मूलांक 7 ते 9 पुढच्या भागात ! शुभं भवतु ।।
महाउपाय- कर्जाचा डोंगर वाढत जातो. व्यापार चालत नाही. माल दुकानात पडून राहतो. कोविडनंतर बऱयाच कुटुंबांचे हाल झाले. एक सोपा पण प्रभावी उपाय सांगतो. श्रद्धेने करावा. हा उपाय रविवारी किंवा अमावास्येच्या दिवशीच करायचा आहे. काळय़ा मिरीचे 9 दाणे घ्यावे, मिरीचे दाणे आदल्या दिवशी आणावे. गंगाजलाने धुवावे. देवासमोर ठेवून महालक्ष्मी अष्टक 3 वेळा म्हणावे. दुसऱया दिवशी सकाळी उजव्या हातात घेऊन कळकळून प्रार्थना करावी. 9 वेळा क्लॉक वाईज आणि 9 वेळा ऍन्टी क्लॉक वाईज हात फिरवून पूर्वेपासून ईशान्येपर्यंत एक एक दाणा आणि आकाशाकडे एक दाणा टाकावा.
सोपी वास्तू टीप- ईशान्य भागात भांडय़ात कमळ ठेवावे. पैसा टिकते.
मेष
नोकरदारांना सुसंधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ राहील. तब्येतीची तक्रार असेल. लहान भावंडांचे सहकार्य मिळेल. परिवारात थोडे कलहाचे प्रसंग येतील. त्यावर समजुतीने मार्ग काढा. आर्थिक आवक चांगली आहे. मित्रांमध्ये मान वाढेल. विदेश प्रयाणाकरता प्रयत्न करणाऱयांना सुसंधी.
उपायः तळहाताच्या मध्यावर कुपुंवाचे बोट लावावे.
वृषभ
धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. व्यापारात नव्या संधी मिळतील. कौटुंबिक सुख उत्तम आहे. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावीत होतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढत आहेत. सावध रहा. वैवाहिक जीवन आनंदी असेल. भाग्याची उत्तम साथ आहे.
उपायः विहिरीत एक चमचा दूध टाकावे.
मिथुन
तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. तुमच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढून वादावादीचे प्रसंग येऊ शकतात. कागदोपत्री व्यवहार जपून करा. प्रवास शक्मयतो टाळा. जमिनीच्या व्यवहारांना गती मिळेल. शेअर्समध्ये लाभ होईल. नोकरदारांसाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनात ताण असेल.
उपायः कन्यापूजन (कुमारीपूजन) करावे.
कर्क
तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. कुटुंबात थोडे वादाचे प्रसंग येऊ शकतात. छोटय़ा प्रवासातून लाभ. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. मनोरंजनाकडे कल राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. भाग्याची साथ आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.
उपायः शिवपिंडीवर दुग्धाभिषेक करा.
सिंह
कुटुंबातील जुने वाद संपतील. धनप्राप्तीचे योग आहेत. भावाचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रवास संभवतो. आईचा किंवा ज्ये÷ स्त्रीचा सल्ला घ्या. फायदा होईल. वाहन सुख उत्तम आहे. धोकादायक गुंतवणूक टाळा. नोकरदारांना कष्टाचे फळ उशिरा मिळेल. जीवनसाथीशी वादविवाद होतील.
उपायः 7 लाल मिरचीच्या बिया आणि कुंकू पाण्यात घालून सूर्याला अर्ध्य द्या.
कन्या
तब्येतीची साथ राहील. अडकलेले पैसे येण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. कुटुंबात सुसंवाद राहील. धनप्राप्ती उत्तम, आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. जमिनीचे व्यवहार टाळा. प्रेमीजनांना सुखमय काळ. नोकरदारांना कामाचा ताण असेल. वैवाहिक सुख उत्तम. मानसन्मान वाढेल.
उपायः दक्षिणाभिमुखी हनुमानाला बुंदीच्या लाडवाचा प्रसाद दाखवा.
तूळ
कित्येक बाबतीत भाग्यवान असाल. तब्येत उत्तम असेल. पैशांची चिंता मिटेल. मांगलिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासातून धनप्राप्ती, शेअर्समध्ये लाभाचे योग आहेत. प्रेमींसाठी काळ अनुकूल आहे. मनोरंजनासाठी पैसे खर्च कराल. नोकरीत प्रमोशनचे योग. वैवाहिक जीवनात मतभेद.
उपायः महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ रोज करा.
वृश्चिक
बऱयाच दिवसानंतर तब्येत सुधारल्यामुळे खुश व्हाल. कौटुंबिक कलह सामंजस्याने हाताळा. भावासंबंधी योजना बनवाल. जमिनीचे व्यवहार पुढे ढकला. संतती सुख उत्तम. नोकरीमध्ये तणावाचे वातावरण असेल. वैवाहिक जोडीदाराला समजावून घ्या. वाहन जपून चालवा.
उपायः कार्तिक स्वामींचे दर्शन घ्या.
धनु
तब्येतीच्या तक्रारी वाढत आहेत, दुर्लक्ष करू नका. कुटुंबाची साथ मिळेल. धनप्राप्ती चांगली राहील. प्रवास टाळा. लेखी व्यवहाराच्या बाबतीत सावध रहा. फसवणूक होऊ शकते. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. प्रेमीजनांनी वाद टाळावेत. नोकरदारांना बढतीचे योग आहेत.
उपायः हनुमान चालीसाचे 11 पाठ मंगळवारी करावे.
मकर
कुटुंबातील क्यक्तीला व्यर्थ सल्ला देऊ नका. मतभेद आणि वादावादी होण्याची शक्मयता आहे. कर्ज घेण्याच्या किंवा देण्याच्या भानगडीत न पडलेले बरे. छोटय़ा प्रवासाचे योग आहेत. भावंडाच्या मदतीने कार्य पूर्ण कराल. शत्रू प्रबळ होत आहेत. लक्ष द्या. नोकरदारांना सुकाळ आहे.
उपायः खाण्याच्या पानावर 2 लवंगा ठेवून प्रवाहित करा. इच्छापूर्ती होईल.
कुंभ
तब्येतीच्या छोटय़ा मोठय़ा तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सगळय़ा बाजूंनी तब्येतीची काळजी घ्या. धनप्राप्ती उत्तम आहे. पारिवारिक सुख चांगले आहे. प्रेमीजनांसाठी काळ अनुकूल. शेअर्समध्ये लाभ. वैवाहिक जीवनात ताणाचे प्रसंग येतील. भाग्याची उत्तम साथ आहे. मानसन्मान वाढेल.
उपायः ‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’ मंत्राचा होईल तितका जप करा.
मीन
उत्तम स्वास्थ्य लाभ आहे. कुटुंबातील ज्ये÷ व्यक्तीशी वाद संभवतो. धनप्राप्तीसाठी संघर्ष करावा लागेल. भावंडांचे सहकार्य मिळणार नाही. जमीन आणि वाहन सुख मिळेल. धोका असणारी गुंतवणूक नको. वैवाहिक जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. लाभाचे उत्तम योग होईल.
उपायः मोहरीचे तेल लावलेली चपाती कुत्र्याला खायला घाला.