पितृपक्षात जन्माला येणारे बालक पुनर्जन्माशी संबंधित
बुधवार दि. 9 ते मंगळवार दि. 15 सप्टेंबर 2020
पितृपंधरवडा विषयी बऱयाच समजुती व गैरसमजुती प्रचलीत आहेत, पण हजारो, लाखो वर्षांपासून चालत आलेल्या परंपराना खोटे म्हणता येणार नाही. हिंदू धर्मासह अनेक धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. या पितृपक्षात जी मुले जन्माला येतात, त्यांचा निश्चितच पूर्वजांशी संबंध असतो. कुटुंबातील कुणीतरी तृप्त-अतृप्त आत्मे या मुलांच्या रुपाने जन्म घेतात व आपले ऋण वसूल करतात किंवा फेडतात, पण याचे लेखी पुरावे उपलब्ध नाहीत, पण जसे मूल मोठे होऊ लागते तसेच त्याचे गुणधर्म दिसू लागतात. पूर्वजन्मात जर कुणाला मदत केलेली असेल अथवा तुमच्या हातून त्याचे चांगले झाले असेल, तर त्याचे ऋण फेडण्यासाठी या जन्मात येण्याचा हा नवा जीव प्रयत्न करीत असतो. तर ज्याला त्रास झाला असेल, कुणीतरी आत्महत्या करण्यास भाग पाडले असेल, खून, मारामाऱया, दंगली, खोटी कागदपत्रे करून मालमत्ता हडप करणे, करणीबाधेसारखी अघोरी कृत्ये करून एखाद्याचा छळवाद झाला असेल तर असे आत्मे अत्यंत क्रोधित होऊन सैरभैर होतात व त्याचा वचपा काढण्यासाठी ते कोणाच्यातरी रूपाने घराण्यात प्रवेश करतात व कोणत्या ना कोणत्या तऱहेने त्रास देऊ लागतात. पण हे त्रास नेमके कसे व केव्हा होतील हे मात्र सांगता येत नाही. त्यासाठीच या महिन्यात जन्माला येणारे मूल कोणत्याही नक्षत्राचे असले तरी त्याच्यासाठी पितरांची शांती अवश्य करून घ्यावी. या पितृपक्षात जन्माला आलेल्या मुलासाठी अमुक शांती करा असे कोणत्याही धर्मग्रंथात आढळत नाही, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण आपल्याला जी गोष्ट माहीत नाही, ती नाही असे म्हणता येत नाही. कारण गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षात आमच्या अभ्यासातून जे काही निष्कर्ष निघाले ते तपासून पाहिले असता त्यात बरेच तथ्य आढळले आहे. टीव्हीवर लहान मुले गाणी, संगीत वगैरे कला सादर करून प्रचंड पैसा कमवतात व आई-वडिलांचे कल्याण करतात. तर काहीजण जन्मापासूनच मातापित्यांचे नुकसान करू लागतात. अपघात, आजार, गंडांतर, आर्थिक हानी, शत्रुपीडा, अग्निप्रवेश, भूकंप, मातापित्यांना गंभीर आजार, अचानक नोकरी सुटणे अथवा व्यवसाय बंद पडणे यासह अनेक अनुभव येऊ लागतात. ज्या अर्थी अशा घटना घडतात, त्याअर्थी कुठेतरी काहीतरी चांगले-वाईट ऋणानुबंध असतात हे मान्य करावेच लागते. देवधर्म, श्राद्धकर्म, पूजाअर्चना, यज्ञयाग वगैरे गोष्टी हल्लीच्या लोकांना पटत नाहीत. पण ज्यावेळी त्रास होतात, त्यावेळी हीच माणसे अगतिक होऊन ज्योतिषी अथवा भटजींचे उंबरठे झिजवू लागतात व अशा बाबींचा काहीजण गैरफायदा घेतात व लोकांना लुबाडतात. त्यामुळे अशाप्रकाराकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बिघडतो व चांगल्या व तज्ञ लोकांवर अन्याय होतो. त्यासाठी देवधर्म, श्राद्ध वगैरेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. हवा आपण पाहू शकत नाही पण ती आहे म्हणून आपले अस्तित्व आहे. बोललेले शब्द दिसत नाहीत, पण ते आपण ऐकत असतो. सुगंध अथवा दुर्गंध डोळय़ांनी पाहू शकत नाही, पण त्याचा अनुभव घेऊ शकतो. ही परमेश्वराची रुपे आहेत. उच्च शिक्षण घेतले, चांगली नोकरी मिळाली किंवा परदेशवारी घडली म्हणजे काही लोक स्वतःला फार मोठे समजतात व देवाधर्मावर श्राद्धकर्मावर टीका करू लागतात. पण असे करू नका. नाग जोपर्यंत शंकराच्या पिंडीवर असतो, तोपर्यंत त्याची पूजा करतात. पण तो एकटाच फिरत असतो त्यावेळी त्याला मारून टाकतात. कारण ज्या पदावर तुम्ही असतात त्या पदाचे महत्त्व त्या व्यक्तीला चिकटलेले असते. त्या पदावरून पायउतार झाल्यावर कुणीही विचारत नाहीत. त्यासाठीच कितीही श्रीमंती आली, पैसा आला, प्रति÷ा मिळाली, विमानाने फिरण्याचे योग आला, तरी पूर्वीच्या परिस्थितीला विसरू नका. कुणाची वेळ केव्हा फिरेल, कोण कधी उच्चपदावर जाईल व कधी खाली कोसळेल हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही कळणार नाही. त्यासाठीच कुणालाही कधीही कमी लेखू नका अथवा कुणाला डोक्मयावर चढवून घेऊ नका. या पितृपक्षात जन्माला येणारे कोणतेही मूल हे शंभर टक्के पूर्वजन्मातील गुण घेऊन आलेले असते हे लक्षात ठेवावे व त्यानुसार जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती पाहून जन्माला आलेली व्यक्ती कोण आहे हे अभ्यासावरून पाहून त्याचा योग्य योग्य निष्कर्ष काढता येऊ शकतो. पण त्यासाठी सखोल अभ्यास व निरीक्षणाची जरूर आहे. केवळ तीन-चार महिन्यांचा कोर्स करून ही विद्या साध्य होत नाही. त्याला पूर्वजन्माचे संचित देखील असावे लागते.
मेष –
चतुर्थातील शुक्रामुळे व्यापार-उद्योगात लाभ होईल. कौटुंबिक जीवन समाधानी व आनंदी राहील. भाग्यस्थानातील केतूमुळे बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. काहीजणांना राजयोगासारखे चांगले फळ मिळेल. आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य व तज्ञ गुरु भेटतील. कोणत्याही कामासाठी आर्थिक अडचण पडणार नाही.
वृषभ –
सतत काही ना काही आर्थिक लाभ होत राहतील. जे काम हाती घ्याल ते कष्टाने साध्य होईल. प्रवास, फोटोग्राफी, चित्रकला यांची आवड असेल तर त्या क्षेत्रात जाण्यास हरकत नाहा.r चतुर्थातील रवीमुळे कामाचा ताण वाढेल.
मिथुन –
धनस्थानातील शुक्रामुळे जुनी थकबाकी वसूल होईल, पण व्यसन, चैन, जुगार यापासून दूर रहावे लागेल. गुरु-केतूच्या शुभयोगामुळे आर्थिक स्थिती भक्कम राहील. विवाहाच्या वाटाघाटीत उत्तम यश मिळेल. काही बाबतीत व्यवहारी वृत्ती न ठेवल्यास नुकसान होऊ शकते.
कर्क –
गुरुची शुभ दृष्टी व्यवसाय स्थानावर असल्याने आर्थिक अडचणी कमी होतील. एखाद्या मित्राकडून ऐनवेळी सहाय्य होण्याची शक्मयता. शुक्र तुमच्या राशीत असल्याने चैनी प्रवृत्ती वाढेल. तसेच एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटू लागेल. रवीचे भ्रमण डोळय़ांचे विकार निर्माण करील. किरकोळ वादावादीतून गैरसमज निर्माण होतील. पती-पत्नीने सामंजस्याने वागणे आवश्यक.
सिंह –
सिंह राशीस्वामी रवीचे सर्व बाबतीत उत्तम सहकार्य मिळेल. त्यामुळे अवघड कामे पूर्ण करू शकाल. शुक्राचे भ्रमण चैनीसाठी खर्च करावयास भाग पाडेल. या शुक्राच्या काळात प्रेम करण्यापासून धोका होऊ शकतो, सावध रहा. गुरु -केतूचे सहकार्य, शिक्षण व अंगच्या कलेमध्ये प्राविण्य मिळवून देईल.
कन्या –
कन्या राशीस्वामी बुध प्रबळ आहे. जिद्दीने कोणतेही काम पूर्ण होईल. आर्थिक समस्या मिटतील. नव्या ओळखीमुळे फायदा होईल. काहीजणांना जवळचे प्रवासाचे योग. शुक्रामुळे मित्र-मैत्रिणांसाठी खर्च करावा लागेल. गुरु-केतूचा सहयोग, कौटुंबिक सुधारणा घडवील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ –
दशमातील शुक्रामुळे कामाचा ताण कमी होईल. आपल्या आवडीचे काम मिळेल. ऐषारामी जीवन जगण्याची इच्छा पूर्ण होईल. सांपत्तिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरी-उद्योगधंद्यात उत्तम लाभ. काहीजणांना मानसन्मानाचे योग. काही क्षेत्रात स्वावलंबीपणाने राहिल्यास मोठ यश मिळेल.
वृश्चिक –
भाग्यस्थानातील शुक्रामुळे काही कामे अत्यंत सहज होतील. मंगल कार्यात यश. नोकरीत बढतीचे योग. व्यवसाय अथवा शुभकार्यासाठी दूरवरचे प्रवास. अचानक काही पाहुणे मंडळी टपकण्याची शक्मयता आहे. शेजारी मुलांच्या गोंधळामुळे वादावादीला तोंड फुटेल. अति घाई, अति गडबड यामुळे संकटाला निमंत्रण द्याल.
धनु –
गुरु-केतू सहकार्यामुळे अडचणीच्या प्रसंगी ऐनवेळी कोणीतरी मदत करतील. शारिरीक आजार कमी होतील. नोकरी व कामधंदा बदलणार असाल तर अनुकूल काळ. विवाहाच्या वाटाघाटीत यश मिळेल. बिघडलेल्या शुक्रामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्याचे योग.
मकर –
पती-पत्नीतील प्रेम वृध्दिंगत होईल. एखादा नवीन व्यवसाय सुरु कराल. पूर्वीचे काही जुनाट वाद संपुष्टात येतील. विद्युत उपकरणे दुरुस्ती करताना काळजी घ्या. किरकोळ चुका जिवावर बेततील. जुन्या गाडय़ा पूर्ण तपासल्याशिवाय बाहेर काढू नका. ऐनवेळी काहीतरी गडबड होईल.
कुंभ –
काहीवेळा अपेक्षा नसतानाही मोठे यश पदरात पडते व त्याचा भावी जीवनावर सखोल परिणाम होतो, असा अनुभव येईल. व्यवसाय क्षेत्रात नवीन काहीतरी करावेसे वाटेल. शैक्षणिक बाबतीत असलेल्या अडचणी दूर होतील. या सप्ताहात जे काही निर्णय घ्याल, त्याचा दूरगामी परिणाम होईल. मानसिक समाधान लाभेल.
मीन –
अतिउत्साह काही वेळेला धोकादायक ठरू शकतो. तसेच चैनी रहाणी लोकांच्या नजरा विस्फारू शकते. त्यासाठी या आठवडय़ात साधेसुधे रहा. पूर्वीची काही देणी असतील तर ती फेडण्याचा प्रयत्न करा. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल.