दिव्याच्या अमावस्येचे महत्त्व ओळखा!
कोणत्याही तीर्थक्षेत्री न जाता सर्व देवांची कृपा प्राप्त करण्याचा व सर्व कामात यश मिळण्याचा सर्वात सोपा उपाय कोणता? असा प्रश्न विचारला असता परमेश्वराने सांगितले की, देव आणि परमेश्वर यातील जो दुवा आहे तो म्हणजे अग्नी. म्हणजेच दिवा. आपण जिथे राहतो त्या घरातच जर दिव्याची आराधना केली तर जीवनातील कोणत्याही गोष्टी साध्य होऊ शकतात. समस्यावर मात करता येऊ शकते. दिवा म्हणजे साक्षात प्राण. त्यासाठी कोणतीही पूजा करताना दिव्याची प्रथम पूजा केली जाते. कारण त्याशिवाय ती पूजा देवाला पोहोचत नाही. दरवषी येणाऱया आषाढी अमावस्येला ‘दिव्याची अवस’ म्हणतात. त्यादिवशी दिव्याची पूजा करायची असते. या दिवशी केलेले दीपपूजन घराण्यातील अनेक दोष नष्ट करते तसेच अडलेली कामे होऊ शकतात. येत्या रविवारी घरातील दिवे दूध -पाण्याने स्वच्छ करावेत. पाटावर लाल वस्त्र घालून त्यावर एक तेलाचा आणि तुपाचा असे दोन दिवे ठेवावेत. पाटाभोवती आकर्षक रांगोळी काढावी. फुलांची आरास करावी. लाहय़ा व पुरणाचा नैवेद्य दाखवावा. हळद, कुंकू, अक्षता, फुले, आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्याची पूजा करावी. ‘दीप, सूर्य, अग्नी, रुपस्तवम तेजस हा तेज उत्तमम. गृहानं मतकृताम, पूजा सर्व कामप्रदो भव’ हा मंत्र जास्तीत जास्त वेळा म्हणावा. दिव्याचे अनेक मंत्र आहेत. त्यातही ‘शुभम करोति कल्याणम’ हा सर्वात सोपा मंत्र आहे. ज्यांना संस्कृत येत असेल त्यांनी वरील मंत्राचा जप करावा. पण जाणकाराकडून हा मंत्र स्वच्छ भाषेत लिहून घ्यावा. घरातील इडा पिडा टळावी, दारिद्रय़ दूर व्हावे, सर्व कामात यश मिळावे, काही खोटेनाटे आरोप वगैरे असतील तर ते दूर व्हावेत, नोकरी-व्यवसायात प्रगती व्हावी, मुलाबाळांचे कल्याण व्हावे, लक्ष्मीची कृपा राहावी अशी प्रार्थना करावी. या दिवशी घरातील वातावरण दिवाळी प्रमाणे आनंदी ठेवावे. मांसाहार आणि व्यसन चुकूनही करू नये. पितृदोष, वास्तुदोष, साडेसाती, दुःख, दारिद्रय़, सर्व बाधा निवारण यासाठी दिव्याची पूजा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. वातावरणात बदल होत असल्याने पूर्वीचे काही आहार वर्ज्य मानलेले आहेत. थ्यास ‘गताहारी’ असे म्हणतात. ‘गटारी’ शब्द वापरून या अमावास्येचा अपमान करू नका. ते फार वाईटरित्या बाधेल. काही प्रांतात ही आषाढी अमावस्या दिवाळी लक्ष्मीपूजनाप्रमाणेच अत्यंत पवित्र मानतात व सर्वत्र रोषणाई करून दिव्यांची आरास करून तिची पूजा करतात. त्यामुळे लक्ष्मीचे आगमन होते व कुटुंबात सुखसमृद्धी नांदते, असा संकेत आहे
मेष
या आठवडय़ात शुक्र सहावा आणि रवि पाचवा आहे. मनुष्य जीवनावर कौटुंबिक सुख, भाग्योदय, भरभराट, पैसाअडका, नोकरी, व्यवसाय या सर्वांवर या दोन ग्रहांचा प्रभाव पडणार आहे. सरकारी क्षेत्रात असलेल्यांना काहीतरी चांगली बातमी कळेल. बेकारांना नोकरी मिळण्याचे योग. शुक्राचे भ्रमण म्हणावे तितके चांगले नाही, पण घरातील वातावरण स्वच्छ व टापटीप ठेवल्यास साक्षात लक्ष्मीचे वास्तव्य राहील. जर लग्नासाठी प्रयत्न करीत असाल तर ज्याला कोणीही नातेवाईक नाहीत अशा व्यक्तीशी विवाह केल्यास उत्तम ठरेल.
वृषभ.
चतुर्थात रवि व पंचमात शुक्र हा ‘मणिकांचन योग’ जुळून आलेला आहे. सर्व काही चांगले आणि जीवनाला कलाटणी देऊन जाणारे राहील. पण काबाडकष्ट करून कमवलेला पैसा मात्र दुसऱयाच्या हाती जाण्याची शक्मयता आहे. त्यासाठी तुम्ही अत्यंत सावध राहावे लागेल. घराण्यात आतापर्यंत कुणीही केलेली नसेल असे एखादे महत्त्वाचे काम कराल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करा. शुक्राचे प्रमाण आर्थिक बाबतीत कमतरता पडू देणार नाही. प्रेमप्रकरण आणि व्यसन यात गुंतू नका.
मिथुन.
पराक्रमात आलेला रवि अतिशय उत्तम फळे देणार आहे. स्वकष्टाने घर बांधण्याचा प्रयत्न कराल. तसेच आर्थिक भरभराट देखील होईल. तीर्थक्षेत्री प्रवासाचे योग. तुमची पूर्वीची आर्थिक परिस्थिती कशीही असो, आगामी कालखंडात ती नक्कीच सुधारणार आहे. चतुर्थातील शुक्रामुळे विवाह ठरवताना जरा काळजी घ्यावी लागेल. दुसऱया कुणाचीही गुपिते बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. निष्कारण नाव खराब होईल. घराचे छत वगैरे बाद झालेले असेल तर ते त्वरित दुरुस्त करा, अन्यथा पु ढे नको त्या अडचणी येण्याची शक्मयता आहे.
कर्क.
धनस्थानी बलवान रवि सर्व क्षेत्रात मोठे यश मिळवून देईल. स्वतःची प्रगती साधून इतरांनाही मदत कराल. पती-पत्नी यांनी परस्परांचे मन संभाळावे, अन्यथा प्रगतीत अडथळे येतील. धार्मिककार्यामध्ये तुमचा सहभाग राहील. मंदिरे, धर्मस्थळे वगैरे बांधण्याचा विचार कराल. सांसारिक सुख उत्तम राहील. शुक्राचे भ्रमण मात्र म्हणावे तितके चांगले नाही. काही कारणांमुळे निष्कारण बदनाम होण्याचा प्रसंग येईल. नोकरी-व्यवसायात कमी श्रमात मोठे धनलाभ होण्याचे योग.
सिंह.
धनस्थानात शुक्राचे आगमन काही बाबतीत शुभ आहे. आर्थिक अडचणी पडणार नाहीत पण खर्चावर निर्बंध राहणार नाही. प्रेमपात्रासाठी मनात नसतानाही मोठे खर्च कराल. व्याघ्रमुखी घर खरेदी करू नका, अथवा त्याच्या घरात जाणे शक्मयतो टाळा. पण जर गोमुखी घर मिळण्याची शक्मयता असेल तर ती संधी सोडू नका. तेथे तुमचे भाग्य उजळेल. सोन्याचांदीची खरेदी या काळात करू नका.
कन्या
तुमच्या राशीत शुक्र आहे. राजासारखे आयुष्य, आरामात व चैनीत रहाल. पण व्यसन, प्रेमप्रकरणे आणि सांसर्गिक विकारापासून जपा. प्रेमप्रकरणात असाल तर जातपात, धर्म, शिक्षण, रूपसुंदरी यात काहीही न पाहता स्वतःचे सर्वस्व ओवाळून टाकण्याचा प्रयत्न कराल, पण त्यात फसवणूक होईल. सावध रहा. रविचे भ्रमण परदेश प्रवास आणि नोकरी यासाठी उत्तम आहे. जर तुमचे प्रयत्न योग्य दिशेने असतील तर नक्की यशस्वी व्हाल.
तूळ.
राशीस्वामी शुक्र 12 व्या स्थानी आहे. खर्चात वाढ आणि आंतरजातीय प्रेम प्रकरणे निर्माण होतील. चारित्र्यावर अनिष्ट परिणाम करणारा हा योग आहे. त्यासाठी सावध रहा. कुणाशीही अतिसलगी करणे अंगलट येईल. लाभातील रविमुळे सरकारकडून येणे असलेली रक्कम मिळेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. या कालखंडात व्यसन आणि मांसाहार यापासून दूर राहिल्यास फार मोठे यश मिळेल. तसेच अत्यंत किचकट कामे देखील सहज होऊन जातील.
वृश्चिक.
लाभातील शुक्र दशमातील रवि हा एक प्रकारचा अत्यंत शुभ असा राजयोग आहे. प्रयत्न करूनही जे मिळणार नाही ते सहज साध्य होऊ शकते. नोकरीसाठी प्रयत्न केला असाल तर त्यात यशस्वी व्हाल. सरकारी कामकाज अडकले असेल तर ते पूर्ण होईल, पण त्याचबरोबर काही व्यक्तींचा संपर्क तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळे काही जणांशी जेवढय़ास तेवढेच संबंध ठेवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. शुक्र लाभात असला तरी कमाईपेक्षा खर्च अधिक होईल.
धनु.
भाग्यस्थानी रवि असल्यामुळे नावलौकिक होण्याचे योग. ज्या क्षेत्रात असाल त्या चमकाल. मालकवर्गाची मर्जी राहील. तुमच्या काही नव्या कल्पना वरि÷ांना आवडतील व काही नवीन जबाबदाऱया तुमच्यावर सोपविल्या जातील. दशमातील शुक्रामुळे कामाचा ताण काही प्रमाणात कमी होईल. पण नोकरीत ओळखीचे रूपांतर प्रेमप्रकरणात होईल. काहीजणांकडून लग्नाचा प्रस्तावही मांडला जाण्याची शक्मयता आहे.
मकर
भाग्यस्थानी रवि धार्मिक गोष्टीकडे मन वळविल. काही बाबतीत चमत्कारिक अनुभव येतील. काळोखी रात्र असता प्रचंड वादळ यावे व त्यात रस्ता चुकावा, अशा घटना घडण्याची शक्मयता आहे. व्यवहारात कसा अनुभव येईल हे पाहावे लागेल. अष्टमातील रविमुळे कितीही गंभीर प्रसंग आले तरी त्यातून निश्चित बचाव होईल. तसेच तुमच्यामुळे अनेकांचे कल्याण होईल तर गंभीर आजारी रुग्ण तुमच्यामुळे बरे होतील.
कुंभ.
अष्टमातील शुक्रामुळे ज्योतिष, मंत्रतंत्र तसेच गूढविद्या शिकण्याचा योग येईल. पैसा बऱयापैकी मिळाला तरी खर्च मात्र वाढत राहतील. शुक्राच्या या कालखंडात कुणालाही जामीन राहू नका, अथवा कोर्टात साक्षीपुरावे देऊ नका. सप्तमातील रविमुळे अत्यंत मानीस्वभावाच्या व्यक्तीशी विवाह संबंध जुळतील, तसेच कोर्ट प्रकरण असेल व तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल.
मीन.
सप्तमस्थानी शुक्र म्हणजे वैवाहिक आनंदाची रेलचेल म्हणता येईल. पण या शुक्रामुळे काही बाबतीत अतिरेक होण्याची शक्मयता असते. त्यासाठी अतिसलगी, खर्च, भावनेच्या भरात शब्द देणे, कुणाला टोचून बोलणे, वर्मावर घाव घालणे अशा प्रकार पासून दूर रहा. रविचे भ्रमण नोकरी-व्यवसाय तसेच इतर बाबतीत मोठे यश देईल. काही नातेवाईकांची मते घेऊनच पुढील कामे करावी लागतील. त्यातही हा कालावधी अतिशय मोलाचा ठरेल.