ओम पाटील, अभिलाषा कट्टीमनी युनिव्हर्सिटी ब्लू
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मुधोळ येथील एस. आर. कंठी महाविद्यालय आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ सिंगल झोन कुस्ती स्पर्धेत भाऊराव काकतकर महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले तर दोन विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी ब्लू किताब पटकाविला. अभिलाषा कट्टीमनी हिची तेलंगण येथे होणाऱया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर ओम हरि पाटील याची हरियाणा येथे होणाऱया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
एस. आर. कंठी महाविद्यालय मुधोळ येथे घेण्यात आलेल्या राणी चन्नम्मा सिंगल झोन कुस्ती स्पर्धेत भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या ओम हरी पाटील (बीए दुसरे वर्ष) याने सुवर्णपदक पटकावित युनिव्हर्सिटी ब्लू किताब पटकाविला. त्याचप्रमाणे यल्लाप्पा कांबळे (बीकॉम पहिले वर्ष) याने रौप्य पदक, ओंकार के पाटील (बीए तृतीय वर्ष) याने कांस्य पदक, वैष्णव काकतकर (बीए प्रथम) व उत्कर्ष जी पाटील (बीए प्रथम वर्ष) यांनी कांस्यपदके पटकाविली.
बेननस्मिथ महाविद्यालय येथे घेण्यात आलेल्या मुलींच्या गटात अभिलाषा कट्टीमनीने (बीकॉम द्वितीय वर्ष) सुवर्ण मिळवित युनिव्हर्सिटी ब्लू किताब पटकाविला. ज्ञानेश्वरी बांदेकर (बीकॉम द्वितीय वर्ष) हिने रौप्य पदक, संजीवनी भातकांडे (बीएससी तृतीय वर्ष) हिने कांस्य, अक्षता चव्हाण (बीकॉम द्वितीय वर्ष) हिने कांस्यपदक पटकाविले. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक काशिराम पाटील, राजू पाटील, क्रीडा प्राध्यापक सुरज पाटील, प्राचार्य, व्यवस्थापक मंडळाकडून प्रोत्साहन लाभत आहे.