सात हजार राख्या पोहोचविल्या भावांपर्यंत
बेळगाव / प्रतिनिधी
भाऊ-बहिणीच्या नात्याला अधिक जवळ आणणारा सण म्हणजे रक्षाबंधन. कोरोनामुळे अनेक बहिणींना भावाच्या घरी जाऊन राखी बांधणे शक्मय झाले नसल्याने पोस्टाद्वारे राखी पाठविण्यात आली. यावषी रक्षाबंधन रविवारी आले. साप्ताहित सुट्टी असतानाही नागरिकांना रक्षाबंधनादिवशीच राखी उपलब्ध व्हावी यासाठी पोस्ट कार्यालयाने साप्ताहिक सुट्टी दिवशीही सेवा सुरू ठेवली होती. पोस्टाच्या या सेवेमुळे भावांना बहिणीने पाठविलेली राखी वेळेत मिळाली.
कोरोनामुळे यावषी पोस्टाद्वारे राखी पाठविणाऱयांची संख्या वाढली. महाराष्ट्रात जाण्यासाठी आरटीपीसीआर गरजेचा असल्याने तेथील बहिणींनी आपल्या भावांना पोस्टाद्वारेच राखी पाठविली. मागील आठ दिवसात बेळगाव पोस्ट विभागाने 7 हजारांहून अधिक राख्या नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचविल्या आहेत. साधे पोस्ट, स्पीड पोस्ट तसेच रजिस्टर पोस्टच्या माध्यमातून या राख्या बेळगाव पोस्ट विभागात दाखल झाल्या होत्या. पोस्टमन तसेच इतर साहाय्यकांनी या राख्या घरोघरी जाऊन पोहोचविल्या.
पोस्ट राखी उपक्रमालाही उत्तम प्रतिसाद
महिलांनी बाजारात जाऊन राखी खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन राखी खरेदी करून ती पाठविण्यासाठी कर्नाटक पोस्ट विभागाने ‘पोस्ट राखी’ हा उपक्रम सुरू केला होता. 100 रुपयांमध्ये राखी व एक संदेश दिलेल्या पत्त्यावर ऑनलाईन पाठविण्यात आले. यालाही बेळगाव विभागातून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पोस्ट अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
एच. बी. हसबी (पोस्ट अधीक्षक, बेळगाव)
रक्षाबंधन सण यावषी रविवारी आला आहे. परंतु राखी भावांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी रविवारीदेखील पोस्टाची सेवा सुरू होती. रविवारी एकूण 1 हजार कर्मचारी व पोस्टमन कामावर कार्यरत होते. त्यामुळे रविवारी साप्ताहिक सुट्टी असतानाही राखी पोहोचविणे सोयीचे झाले, असे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.