४० पैकी ३४ उमेदवारांची यादी जाहीर
ऑनलाईन टीम/तरुण भारत
जपने गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 40 पैकी 34 जागांवरील उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहे. मात्र, दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. उत्पल यांनी ज्या पणजी विधानसभेचा आग्रह धरला होता, त्या मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपच्या 40 पैकी 34 उमदेवारांची यादी जाहीर कले. मात्र, पणजीतून उत्पल पर्रिकरांऐवजी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.