प्रतिनिधी/ पणजी
भारतीय जनता पक्ष साळगावमध्ये उमेदवारी देण्याबाबत नव्याने फेरविचार करीत असून प्राप्त माहितीनुसार जयेश साळगावकर ऐवजी पुन्हा एकदा माजी मंत्री दिलीप परुळेकर यांच्या नावाचा विचार पक्षाने सुरु केला आहे.
पक्षाच्या काही नेत्यांनी अलीकडे साळगाव मतदारसंघाचा फेरआढावा घेतला असता दिलीप परुळेकर यांच्या बाजूने थोडा कल जास्त आहे तसेच भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे साळगावकर यांच्या बाजूने राहाण्यास तयार नसल्याने पक्ष पुन्हा एकदा परुळेकर यांना उमेदवारी देण्याबाबत फेरविचार करीत असल्याचे वृत्त आहे.