बेळगाव : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्तीला कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी किरण जाधव म्हणाले, धर्मवीर संभाजी महाराजांचे कार्य महान असून त्यांचे कार्य आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी मायभूमीसाठी त्याग केला. त्याचप्रमाणे प्रत्येकाने देशकार्यासाठी कार्य केले पाहिजे. याप्रसंगी संतोष पेडणेकर, रमेश पाटील, मिलिंद कदम, विनायक मुचंडीकर व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.