दोघेच घोडय़ावर बसून पक्ष चालवितातः पक्ष कमर्शियल बनला
प्रतिनिधी /म्हापसा
आजही आपण भरतीय जनता पक्षामध्ये आहे. मात्र आता मला असे ऐकू येऊ लागले आहे की, कळंगुट मतदारसंघात भाजपची तिकीट मला न देता दुसरा उमेदवार निवडला जाणार आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपणास अजून काही सांगितलेले नाही. आपला जाहीरनामा विकासाचा असून कळंगुट व शिवोली मतदारसंघातील नागरीक आपल्या बरोबर आहेत. पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी त्याचा आपणास फ्ढरक पडत नाही. जनेतेने आपणस तिकीट दिली आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही. आम्ही लोकप्रतिनिधी जे निर्णय घेतो ते पक्षाला मान्य नसतात. ‘तुम्ही चलोंक लागा’ असे सांगितले जाते. भाजप हा आता कमर्शियल पक्ष झालेला आहे. फ्ढक्त दोघेजण घोडय़ावर बसून पक्ष चालवित आहेत. ज्यांना इतर पक्षांनी हाकलून दिले होते तेच आज घोडय़ावर बसून वेगाने चालत आहेत, ते कुठे पळत आहेत हे त्यांनाच माहित नाही. पक्षश्रेष्ठींनी आताच त्यांच्यावर लगाम लावावा अन्यथा पक्षाला वेगळया दिशेने सामोरे जावे लागेल, असे लोबो यांनी सांगितले.
शिवोली, कळंगुट मतदारसंघात पायाभूत सुविधा मिळत नाहीत, पाणी देऊ शकत नाहीत तर आम्ही काय करणार. हर घर जल म्हणतो ते पाणी अद्याप पोचले नाही. सरकार मुलभूत गरजा देऊ शकले नाही तर आम्ही काय करणार. आम्ही नवीन क्रांती घडवून आणणार आहोत. आणि याच क्रांतीचे नवीन सरकार असणार आहे. मायकल लोबोंची पत्नी डिलायला लोबो ही शिवोली मतदासंघातून निवडणूक लढवणार म्हणून कळंगुटमध्ये लोबोंना तिकीट नाही अशी अफ्ढवा मतदासंघात पसरली आहे. ही अफ्ढवा पक्षाने केली आहे. काहींना लोबो आमदार पाहिजे तर काहींना नको आहे, असे लोबो यांनी सांगितले.
पक्षाने पर्रीकरांची तत्वे बाजूला सारली
तृणमुल, आप, मगो, काँग्रेसचे नेते आपणास भेटून गेले आहेत. योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. भाजपात एकाच कुटुंबात दोन तिकीट देणार नाही असे सांगितले जाते. स्व. मनोहर पर्रीकरांच्या फ्ढाŸलोवरना बाजूला ठेवले जाते. त्यात मंत्री लोबो एक आहेत, लोबो यांनी सांगितले.
घोडय़ावर बसलेली समिती बरखास्त करा
एकेकाळी लोकांनी, पक्षाने हाकलपट्टी करून राज्याबाहेर पाठविले होते ते आज राज्यात पुन्हा घोडय़ावर बसले आहेत. पक्षश्रेष्ठींनी आमच्या सोडवाव्यात व घोडय़ावर बसलेली समिती बरखास्त करावी. आज पक्षाला मोठी छिद्रे पडली आहेत ती दुरूस्त करा. साळगावचे कार्यकर्ते दुरावले त्यांना खूप दुःख झाले. आम्हाला आयात केलेले नेते नकोत. त्यांना भाजप पक्ष म्हणजे काय ते माहित आहे काय, असे मंत्री लोबो म्हणाले.