प्रतिनिधी/ रत्नागिरी
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे आणि भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्यावर खा. विनायक राऊत आणि शिवसेनेकडून होणाऱया टीकेला रविवारी रत्नागिरीमध्ये भाजपा पदाधिकाऱयांनी खा. राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून व पाणी पाजून निषेध व्यक्त केल़ा
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात रविवारी दुपारी भाजपा कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी शिवसेनेच्या कृतीचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या कृतीला भाजपाकडून जशास तसे उत्तर देत भाजपा पदाधिकायांनी कार्यकर्त्यांनी मारुती मंदिर येथे खा. विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पाणी पाजून जोडे मारले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, पदाधिकारी पिंटय़ा निवळकर, उपतालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण, मेहताब साखरकर, ययाती शिवलकर, रामा शेलटकर, अक्षय चाळके, अमर किर, शोएब खान, गुरुनाथ चव्हाण, रमाकांत आयरे, सर्वेश सावंत, पप्पू सरफरे, इंतिखाब पठाण, भाई परपते, मन्सूर मुकादम ,वल्लभ सरफरे,मनोज तांडेल, आशु सावंत, साहिल पवार, विशाल पाटील, राजेश झगडे, महिला पदाधिकारी शोभा जीरोळे,विद्या सुर्वे, सोनल चाळके, जयश्री भंडारी आदी उपस्थित होते.