जनतेसमोर आणला-आमदार सुदिन ढवळीकर यांची खरमरीत टिका
वार्ताहर / मडकई
भाजप सरकारने आपल्या मंत्र्यांची ज्येष्ठता यादी जाहीर करताना ज्येष्ठ मंत्र्यांना खालच्या स्थानी आणून त्यांच्या ज्येष्ठतेचा अवमान केलेला आहे. अनअनुभवीना ज्येष्ठता यादी पदोन्नती देऊन ज्येष्ठतेच्या तत्वांची पायमल्ली केलेली आहे. यावरूनच भाजपचे दाखवण्याचे दात वेगळे व खाण्याचे दात वेगळे आहेत हे दिसून येते अशी खरमरीत टीका मगोचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. अल्पसंख्यांचे प्रतिनीधीत्व करणारे फिलीप नेरी यांना नवव्या स्थानी पोहचवून भाजपाने त्यांचा व तमाम अल्प संख्याकाचा अवमान केलेला आहे. फिलीप नेरी हे चार वेळा निवडून आलेले आहे. ते स्वतः शिक्षीत असून अभियंते आहे. कॉग्रेस पक्ष फोडण्यास ज्या मंत्र्याने महत्त्वाची भूमिका बजावून भाजप सत्ता मजबूत करण्यास हातभार लावाला त्या बिचाऱया मायकल लोबोना सर्वांत शेवटच्या स्थानी आणून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. कोवीडच्या महामारीत कौतुकास्पद काम करणाऱया विश्वजीत राणेंना नवव्या स्थानावरून सहाव्या स्थानी आणतानाही त्यांच्यार अन्यायच केलेला आहे. कॉग्रेस आमदार फोडून भाजपात घेऊन गेलेल्या बाबूश मोन्सेरात यांच्या पत्नी जेनीफोर मोन्सेरात यांना खालचे स्थान दाखवून फुटीराना त्यांची जागा दाखवू असे संकेत भाजपाने दिले आहेत.