भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीला जोरदार धक्का
प्रतिनिधी / सांगली
शिवसेना नेते तथा आमदार दिवाकर रावते साहेब व संपर्क प्रमुख मा. नितिन बानुगडे पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थित भाजप अल्पसंख्याक सांगली जिल्हाध्यक्ष मा. नईम (भाई) शेख यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शहर प्रमुख मा. मंहेद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली शेख यांनी प्रवेश केल्याने अनेक युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेख यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यातील असंघटित अल्पसंख्याक व दुर्बल घटकांतील लोकांना एकत्रित आणण्यासाठी काट्याची कसरत करत सर्वांना एका प्रवाहात आणले व या अल्पसंख्याक समाजातील मुख्य प्रश्नावर काम करण्यासाठी मेहनत घेत. शेख यांचे सामाजिक काम अत्यंत चांगले आहे ते सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचूण त्याच्या अडीअडचणी जाणू घेतात व सोडण्यासाठी मेहनत घेत काम करत असतात. त्यांच्या या कामाची दखल शिवसेना शहर प्रमुख मंहेद्र चंडाळे यांनी घेतली व वेळोवेळी लागेल ते सहकार्य केले.
शेख यांनी शिवसेनेची सामान्य जनतेची काम करण्याची तळमळ व जिद्द पाहिली व तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना जो मान सन्मान आपुलकी दिली जाते. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे सामान्य जनतेला मान बिंदू टेवून काम करत आहे. ते सर्व सामान्य जनतेला आपलेसे वाटतात जनतेला जे अपेक्षित आहे ते निर्णय घेतात या सर्व गोष्टींनी प्रभावी होत. शेख यांनी शिवसेना शहरप्रमुख मंहेद्र चंडाळे यांच्यात एक बैठक पार पडली व मा. नईम (भाई) शेख यांनी आपल्या सर्व सहकार्याना विश्वासात घेऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला व शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते तथा आमदार दिवाकर रावते साहेब व संपर्क प्रमुख मा. नितिन बानुगडे पाटील सर, जिल्हाप्रमुख आनंदराव (बापू) पवार संजय (बापू) विभुते, शहर प्रमुख महेंद्र (भाऊ) चंडाळे, युवासेना उपजिल्हाधिकारी मोहसीन मुल्ला यांच्या उपस्थितीत मा.नईम (भाई) शेख यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यां सोबत शिवसेनेत प्रवेश केले.