प्रतिनिधी / सोलापूर
केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकर्याबद्दलआक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सोलापुरात शिवसेनेच्यावतीने आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार दानवे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी जाळण्यास मज्जाव केल्यानंतर पुतळ्यास जोडो मारो करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गणेश वानकर, माजी आमदार दिलीप माने, प्रकाश वानकर, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रावसाहेब दानवे मुर्दाबाद, भाजप सरकारचा निषेध असो, या दानवेचे करायचं काय, खाली मुंडी वर पाय, शिवसेना पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.