विकेंड कर्फ्यूमुळे बाजारपेठेत अगोदरच खरेदी : बाजारात रताळी आवक वाढली
वार्ताहर /अगसगे
बेळगाव एपीएमसीमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा, बटाटा, रताळी यांचा भाव स्थिर होता. जवारी बटाटा दरात प्रति क्विंटल 200 रुपयांनी वाढ झाली असून भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे.
शनिवार-रविवार विकेंड कर्फ्यू असल्यामुळे सोमवारी व बुधवारी बाजारामध्ये कांदा-बटाटा खरेदीसाठी खरेदीदार आले होते. खरेदी-विक्री अधिक झाल्याने कांदा-बटाटा दरात वाढ झाली आहे.
सध्या बाजारात रताळय़ाची आवक मोठय़ा प्रमाणात होत आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्लीमध्ये पाऊस असल्यामुळे मागणी कमी आहे. उत्तरप्रदेशमध्ये मागणी जास्त असल्याची माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.
परराज्यांतून व बेळगाव जिल्हय़ामधून भाजीपाला मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. यामुळे भाजीपाला दरात घसरण झाल्याची माहिती भाजी व्यापारी भैरू कंग्राळकर यांनी दिली.
नवीन कांदा दाखल
एपीएमसी बाजारात महाराष्ट्रातून नवीन कांदा 30 ट्रक, जुना कांदा 5 ट्रक व कर्नाटक कांदा 2 ट्रक दाखल झाला आहे. इंदोरहून नवीन बटाटा 7 ट्रक, आग्राहून बटाटा 3 ट्रक, बेळगाव येथील बटाटय़ाची एक ट्रक आवक विक्रीसाठी एपीएमसीमध्ये दाखल झाल्याची माहिती अडत व्यापारी कल्लाप्पा गडकरी यांनी दिली.
बटाटा प्रति क्विंटल
- इंदोर बटाटा 1400 ते 1800 रु.
- आग्रा बटाटा 500 ते 1200 रु.
- तळेगाव… 1500 ते 1600 रु.
- जवारी बटाटा 1800 ते 2700 रु.
- रताळी…. 1200 ते 1450 रु.
भाजीपाला प्रति दहा किलो
- ढबू मिरची 500 ते 550 रु.
- बिन्स…… 250 ते 280 रु.
- कारली…. 400 ते 450 रु.
- दोडकी…. 500 ते 550 रु.
- कोबी…… 250 ते 280 रु.
- इंग्लिश गाजर 600 ते 650 रु.
- भेंडी…….. 750 ते 800 रु.
- बिट…….. 300 ते 350 रु.
- जवारी काकडी 350 ते 400 रु.
- पांढरी काकडी 120 ते 150 रु.
- आले नवीन 200 ते 220
- आले जुने.. 300 ते 350 रु.
- मटार…… 400 ते 420 रु.
- मिरची….. 700 ते 750 रु.
- टोमॅटो प्रति ट्रे 600 ते 700 रु.
- इंदोर ढबू मिरची………………300 ते 400 रु.
- दुधी भोपळा डझन…………….150 ते 180 रु.
- गोल भोपळा प्रतिक्विंटल..2500 ते 3000 रु.
महाराष्ट्र जुना कांदा प्रति क्विंटल
- गोळी…… 1500 ते 2200 रु.
- मीडियम.. 2500 ते 3500 रु.
- मोठवड…. 3500 ते 3700 रु.
- गोळा…… 3700 ते 4000 रु.
महाराष्ट्र नवीन कांदा प्रति क्विंटल
- गोळी…… 1000 ते 2200 रु.
- मीडियम.. 2200 ते 2800 रु.
- मोठवड…. 2800 ते 3100 रु.
- गोळा…… 3100 ते 3300 रु.
कर्नाटक कांदा प्रति क्विंटल
- गोळी…… 1200 ते 1800 रु.
- मीडियम.. 2000 ते 2500 रु.
- मोठवड…. 2500 ते 2800 रु.
- गोळा…… 2800 ते 3200 रु.
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी…….. 800 ते 1000 रु.
- शेपू……… 500 ते 600 रु.
- पालक….. 300 ते 400 रु.
- कांदापात. 400 ते 500 रु.
- कोथिंबीर. 700 ते 800 रु.
- लाल भाजी…………….. 500 ते 600 रु