पेठ वडगाव / प्रतिनिधी
सद्याच्या काळात माणूस माणसापासून दूर होऊन नातीगोती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र समाजात दिसु लागले आहे. तर प्राणिमात्रावरील प्रेम दुर्लभ होत असताना भादोले (ता.हातकणंगले) येथील शंकर पाटील यांच्या कुटुंबियानी आपल्या लाडक्या ‘पाखऱ्या’ या बैलाचा दुसरा वाढदिवस थाटामाटात साजरा करुन आगळा वेगळा संदेश समाजात देण्याचे काम केले आहे. या अनोख्या वाढदिवसाची चर्चा परिसरात होत आहे.
या वाढदिवसाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी या वाढदिवसाला आवर्जून उपस्थिती लावली. पाटील कुटुंबियांनी पाखऱ्याच्या वाढदिवसानिमित्त ४०० लोकांना जेवण घातले. तर वाढदिवसाला आलेले अनेक मित्रमंडळीनी गिफ्ट म्हणून पाखऱ्याला सापती, झूल, वेसण, दोरखंड, नाथ, शिवदा वस्तू घेऊन आले होते. आपल्या लेकरांच्या पेक्षाही बळीराजाने या मुक्या जनावरांना लावलेला लळा परिसरात कौतुकाचा विषय