ऑनलाईन टीम / हैदराबाद :
लंडनमध्ये दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या Mind Sports Olympiad (MSO) या स्पर्धेत यंदा भारताचा नीलकंठ भानु प्रकाश हा 20 वर्षीय मुलगा जगातील सर्वात वेगवान मानवी कॅल्क्युलेटर ठरला आहे. त्याने या स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले आहे.
नीलकंठ दिल्ली विश्व महाविद्यालयातील सेंट स्टीफन कॉलेजमध्ये गणितचा (ऑनर्स) विद्यार्थी आहे. मानवी कॅलक्युलेटर होण्यासाठी नीलकंठ याने 4 जागतिक विक्रम आणि 50 लिम्का रेकॉर्ड केले आहे. तो Exploring Infinities या प्रोजेक्टवर काम करत असून, त्याला देशातील सर्व सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना गणितात हुशार बनवायचे आहे.
पाच वर्षांपूर्वी नीळकंठला अपघात झाला होता. त्यामध्ये त्याच्या डोक्याला जखम झाली होती. त्यानंतर स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी त्याने मेंटल गणिते करण्यास सुरुवात केली.
शकुंतला देवींचे रेकॉर्ड तोडले
‘ह्युमन कम्प्युटर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवींना कठीण गणितांची सहज गणना करता येत होती. त्यांचे रेकॉर्ड नीळकंठने तोडले आहे. शकुंतला देवीवरील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून विद्या बालन मुख्य भूमिकेत आहे