ट्रंप यांच्या विधानामुळे पुन्हा गदारोळ
वॉशिंग्टन
भारत आणि चीनमध्ये वायु प्रदूषणाकडे लक्ष दिले न गेल्याने तेथील हवा अत्यंत खराब आहे, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीच्या आधी आपले प्रतिस्पर्धी डेमॉक्रेटिक पक्षाचे ज्यो बायडन यांच्याशी केलेल्या दुसऱया वादविवादात त्यांनी हे विधान केले. बायडन यांच्या पर्यावरण योजनेवर त्यांनी टीका केली.
बायडन यांची पर्यावरण योजना अमेरिकेतील अनेक प्रांतांसाठी आर्थिक धोका ठरणार आहे. टेक्सास, ओक्लोहोमा इत्यादी प्रांत यामध्ये भरडून निघणार आहेत. त्यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये अमेरिकेची आर्थिक घसरण हाताबाहेर जाइwल. पॅरीस येथील पर्यावरण करार अमेरिकेच्या हिताचा नाही. परिणामी त्यातून बाहेर पडण्याचा योग्य निर्णय आम्ही घेतला, असे प्रतिपादनही त्यांनी केले. ट्रंप यांच्या विधानावर
भारतात नाराजी निर्माण झाली आहे.
भारतात संतप्त प्रतिक्रिया
अमेरिकेचे विदेश व्यवहार मंत्री माईक पाँपिओ आणि सच्ंरक्षणमंत्री मार्क एस्पर लवकरच भारतात येत आहेत. भारत व अमेरिका यांच्यात या दौऱयात महत्वाचा संरक्षण करारा होण्याची शक्यता आहे. अशावेळी ट्रंप यांनी केलेले हे विधान केल्याने भारतात अस्वस्थता निर्माण झाली असून संतप्त प्रतिक्रियाही येत आहे.