क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमध्ये स्केटिंगकडे बराच कल वाढला असून कोल्हापूरनंतर बेळगावमध्येही स्केटिंग अकादमी सुरू झाल्या आहेत. त्यांना आणखी तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी टीम इंडियाचे माजी स्केटिंग प्रशिक्षक प्रवीण देशपांडे हे बेळगावात दाखल झाले आहेत.
बेळगावमध्ये आल्यानंतर रमेश परदेशी, तुकाराम पाटील, बसवराज कोरीशेट्टी आणि बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी त्यांचा सन्मान केला. बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर देशपांडे यांनी केएलई संचलित लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर रविवारपासून स्केटिंगपटूंना मार्गदर्शन सुरू केले आहे. याप्रसंगी प्रशिक्षक मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगने, योगेश कुलकर्णी, अजित शिलेदार, आशिष वाघ आणि बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचे स्केटिंगपटू आणि पालक उपस्थित होते.