कठोर कारवाईचे सरकारकडून संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वाद भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. आपल्या वेबसाईटवर ट्विटरने जगाचा नकाशा जारी केला असून त्यात जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगवेगळे देश असल्याचे दाखवले आहे. आता भारताने या प्रकारावरून आक्रमक पवित्रा घेतला असून ट्विटरला पुन्हा एकदा सक्त ताकीद दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार वादाची मालिका सुरू आहे. त्यातच आता भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप होत आहे. एका ट्विटर युजरने ही बाब समोर आणली आहे. ट्विटरच्या करिअर पेजवर गेल्यावर त्यावर दिसणाऱया नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारतापासून विभक्त दाखवण्यात आले आहेत. या प्रकारानंतर अनेक नेटिझन्सनी अन्य सोशल माध्यमांचा आधार घेत यासंबंधी आवाज उठविल्यानंतर आता केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. ट्विटरविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
मागील वषीही ट्विटरने भारताच्या नकाशासोबत छेडछाड केली होती. यापूर्वी 12 नोव्हेंबर 2020 रोजी सरकारने लेहला केंद्रशासित प्रदेश लडाखच्या ऐवजी जम्मू-काश्मीरचा भाग दाखवल्याप्रकरणी ट्विटरला नोटीस जारी केली होती. आता दुसऱयांदा हा प्रकार घडल्यामुळे ट्विटरने दुरुस्ती केली नाही तर आयटी कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत ट्विटरवर कारवाई केली जाऊ शकते.