ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 69 हजार 921 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 819 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 36 लाख 91 हजार 167 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 65 हजार 288 एवढी आहे.
सध्या देशात 7 लाख 85 हजार 996 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 28 लाख 39 हजार 883 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 4 कोटी 33 लाख 24 हजार 834 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 16 हजार 920 रुग्णांची तपासणी सोमवारी एका दिवसात करण्यात आली.