ऑनलाईन टीम / लेह :
चीनने अक्साई चीन परिसरात 50 हजार सैन्य तैनात केले आहे. त्यामुळे भारतीय लष्करानेही युद्धसज्जता ठेवत पहिल्यांदाच दौलत बेग ओल्डी येथे मिसाईलचा मारा करणाऱ्या T-90 टँकचा ताफा आणि चार हजार सैन्य वाहनांसह तैनात केले आहे.
भारतीय लष्कराने दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये अडवान्स लँडिंग ग्राउंड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरात टँक देखील तैनात करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराची चीनच्या हालचालींवर करडी नजर आहे. पेट्रोलिंग पॉइंट्स 14, 15, 16, 17 आणि पेंगोंग त्सो फिंगर परिसरात चीनी आक्रामकतेनंतर आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स (एपीसीएस) आणि इन्फेंटरी कॉम्बॅट वाहने, एम 777 155mm होवित्जर आणि 130 mm बंदुका सुरुवातीलाच पाठविण्यात आल्या आहेत.
पँगाँग टीएसओ, डेपसांग या भागामधून चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे हटलेले नाही. तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे भारतानेही युद्धसज्जता ठेवली आहे.