ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील ‘जुबिलंट लाइफ सायन्स’ ही फार्मास्युटिकल कंपनी जगातील 127 देशांना ‘रेमडेसिवीर’ या औषधांचा पुरवठा करणार आहे. यासाठी या कंपनीने अमेरिकेच्या ‘गिलियड’ कंपनीशी करार केला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप कोणतेही ठोस औषध किंवा लस उपलब्ध नाही. पण इतर रोगांवरील काही औषधे कोरोनावर प्रभावी ठरतात. त्यापैकीच एक म्हणजे रेमडेसिवीर. भारतातील जुबिलंट लाइफ सायन्स ही कंपनी जगातील 127 देशांना या औषधांचा पुरवठा करणार आहे.
रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्यासाठी जुबिलंट लाइफ सायन्स या कंपनीने गिलियड या अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. हा करार भारतआणि इतर 127 देशांसाठी असेल. गिलियडने रेमडेसिवीर बनविण्यासाठी तीन भारतीयकंपन्यांशी करार केला आहे. या तीन कंपन्यांमध्ये ज्युबिलंट लाइफ सायन्स, हेटरो आणि सिप्ला ही आहेत. रेमडेसिवीर बनविण्याच्या प्रक्रियेचे तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचा या कंपन्यांना हक्क असणार आहे. त्यामुळे या औषधाचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. तसेच कंपनीला या औषधांची किंमत ठरवण्याचा अधिकार असेल.