जगातील पहिल्या 100 मध्ये रिलायन्स जिओ, एलआयसी आणि मारुतीचा समावेश शक्मय
वृत्तसंस्था/ मुंबई
आगामी काळात देशामधील प्रमुख कंपन्या जगातील पहिल्या 100 मध्ये समाविष्ट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सीचा अगोदरपासूनच समावेश असून रिलायन्स जिओ, रिलायन्स रिटेल, एलआयसी, मारुती सुझुकी आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांचाही समावेश होण्याचे संकेत आहेत.
जगामधील प्रमुख 100 कंपन्यांच्या यादीत भारतामधील कंपन्या प्रवेश करुन येणाऱया काळात भारताचा दबदबा निर्माण करण्याची शक्मयता असल्याची माहिती के.आर. चौक्सी सिक्मयुरिटिजचे एम. डी. देवेन चोक्सी यांनी दिली आहे. मारुती सुझुकी कंपनीचा ग्लोबल कंपन्यांमध्ये समावेश होणार आहे तर एलआयसीही या स्पर्धेत दावेदार ठरण्याचे एसएमसी ग्लोबलचे एमडी डी. के. अग्रवाल यांनी म्हटले आहे.
भारताची सध्याची वाटचाल आणि कंपन्यांची विविध टप्प्यावरील होत असणारी प्रगती ही भारताची उद्योग क्षेत्रात नव्याने ओळख निर्माण करणार असल्याचेही म्हटले आहे. यामुळे भारताची अर्थव्यवस्थाही येत्या दोन-तीन वर्षात वेगाने विकसीत होणार असून कंपनीच्या मूल्यात तेजी येऊन सकारात्मक वाटचाल निर्माण होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
100 मध्ये अमेरिकेच्या 56 कंपन्या
जगामधील पहिल्या 100 कंपन्यांमध्ये 56 कंपन्या या एकटय़ा अमेरिकेच्या असून यामध्ये अधिकतर टेक्नॉलॉजी कंपन्यांचा समावेश आहे. 100 मध्ये 14 नवीन कंपन्यांचा समावेश झाला आहे. यामध्ये 2 कंपन्या आयपीओच्या आधारे आल्या आहेत. नवीन 14 पैकी 8 कंपन्या या पुन्हा अमेरिकेच्याच आहेत.