वॉशिंग्टन
हुशार व कुशल बुद्धिवंत भारतीय आता पुढील नोकरीसाठी कॅनडा देशाला प्राधान्य देत आहेत, असे दिसून आले आहे. अमेरिकेला अनेकांनी नापसंती दर्शविली आहे.
भारतातील हुशार उमेदवारांनी अमेरिकेऐवजी कॅनडाची निवड करण्यास जास्त पसंती दर्शविली असून यामागे अमेरिकेतील एच1बी व्हिसा नियम कारणीभूत ठरले आहेत. याची दखल घेत अमेरिकेने आता अशा भारतीयांना कॅनडात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकन काँग्रेसने अमेरिकेतील भरतीबाबत प्रक्रिया वेगवान करण्याची कायदेतज्ञांनी केली आहे. काम करण्यासंबंधातील ग्रीन कार्डसाठी दशकापासून 20 लाख उमेदवार वाट पाहात असल्याची बाबही समोर आली आहे.