वृत्तसंस्था/ गोंडोमेर
बुधवारपासून येथे सुरू होणाऱया ऑलिंपिक पात्रता फेरीच्या सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या पुरूष संघाला इतिहास घडविण्याची संधी निर्माण झाली आहे. या स्पर्धेत भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली तर ते टोकियो ऑलिंपिकसाठी पहिल्यांदा पात्र ठरतील.
भारतीय पुरूष संघात जी सत्येतन, शरथ कमल आणि हरमिंत देसाई यांचा समावेश आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला चेन्नईमध्ये खास प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्यासाठी सराव शिबीर आयोजित केले होते. त्यानंतर भारतीय पुरूष टेटे संघ जर्मनीला रवाना झाला होता. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनतर्फे पोर्तुगालमधील ऑलिंपिक पात्रतेची स्पर्धा भरविण्यात आली असून पुरूष गटात कोरियाला टॉप सिडेंग देण्यात आले असून चीन तैपैई दुसऱया, स्वीडन तिसऱया, फ्रान्स चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानावर आहे. महिलांच्या विभागात हाँगकाँग पहिल्या स्थानावर असून चीन तैपेई दुसऱया, सिंगापूर तिसऱया, कोरिया चौथ्या, रूमानिया पाचव्या स्थानावर आहे.