मालवण/प्रतिनिधी-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन २०११ ते २०१४ अखेर पर्यंत नोंदीत असलेल्या घरेलू महीला कामगारांना लाॅकडाऊन आर्थिक मदत मागणीसाठी भारतीय मजदूर संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला यश आले असून ज्या घरेलू महीला कामगारांनी कामगार अधिकारी कार्यालयात आपल्या नोंदणीचे आॅनलाईन अपडेट केलेले आहे अश्या ३१४ घरेलू महीला कामगारांना प्रलंबीत लाॅकडावून आर्थिक मदत ₹ १५००/- प्रमाणे ४ लाख ७१ हजार जमा होणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री हरी चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्रातील एप्रिल २०२१ च्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याणकारी मंडळाजवळ नोंदीत असलेल्या घरेलु कामगारांना आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली होती त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने प्रथम सन २०१५ ते २०२१ पर्यंत नोंदीत असलेल्या घरेलु कामगारांना ₹ १५००/- तूटपुंजी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६९२ घरेलु महीला कामगारांना १० लाख ३८ हजार एवढी रक्कम कामगारांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली.