ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी बी.व्ही. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे जनरल सेक्रेटरी केसी वेणुगोपाल यांच्या अधिकृत निवेदनानुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी श्रीनिवास यांची निवड केली. यापूर्वी श्रीनिवास भारतीय युवक काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष केशवचंद यादव यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर श्रीनिवास यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. 48 वर्षीय श्रीनिवास यांनी एनसीयूआयचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर श्रीनिवास म्हणाले, युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांचा आवाज उठवण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी आणि काँग्रेसच्या विचारसरणीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही कोणताही कसूर सोडणार नाही.