क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
भारतीय यूथ हॉस्टेल असोसिएशनच्या मडगाव शाखा अध्यक्षपदी दीपक देसाई यांची एकमताने निवड करण्यात आली. यूथ हॉस्टेल मडगावची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी आमसभा नुकतीच झाली.
संघटनेच्या उपाध्यक्षपदी हृदयनाथ शिरोडकर व अश्वेत माजाळीकर, चेअरमनपदी फिलोमेन कॉस्ता तर कोषाध्यक्षपदी ज्योती कामत यांची निवड झाली. सुदेश नागवेकर, राजेश शेटय़े, नासिर शेख, अनिशा आर्सेकर आणि बॅन्सिला आरावजो यांची सदस्यपदी निवड झाली.
क्रीडा खात्याचे अधिकारी आणि फातोर्डा स्टेडियमचे माजी व्यवस्थापक लक्ष्मीदास मंगेशकर यांची संघटनेच्या महत्त्वपूर्ण अशा सचिवपदावर एकमताने निवड करण्यात आली. याशिवाय जयश्री ससीकुमारची आयोजन सचिवपदी निवड झाली. या नवीन मंडळाच्या निवडीची प्रक्रिया सुदेश नागवेकर यांच्या देखरेखेखाली झाली.