ऑनलाईन टीम / सिक्कीम :
सिक्कीमच्या पठारावर 17 हजार फूट बर्फाळ पहाडी प्रदेशात भटकंती करताना रस्ता चुकलेल्या तीन चिनी प्रवाशांच्या मदतीला भारतीय लष्कर देवदूतासारखे धावून गेले. ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या या प्रवाशांना ऑक्सिजन सिलेंडर, गरम कपडे आणि जेवण देऊन जवानांनी मानवता जपली.
हे तिन्ही चिनी प्रवासी 3 सप्टेंबरला आपल्या कारमधून सिक्कीमच्या पठारावर भटकंतीसाठी गेले होते. मात्र, 17 हजार फूट बर्फाळ पहाडी प्रदेशात ते रस्ता चुकले. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने श्वास कोंडू लागला. सीमारेषेवर पहारा देणाऱ्या जवानांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी धाव घेतली.
जवानांनी चिनी प्रवाशांना ऑक्सिजन सिलेंडरसह गरम कपडे आणि जेवण दिले. त्यानंतर चिनी प्रवाशांची नादुरुस्त कार दुरुस्त करून त्यांना मुख्य रस्त्यावर आणून सोडले.