वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्रीसमध्ये रविवारपासून सुरू होणाऱया आंतरराष्ट्रीय वेटलिफ्ंिटग फेडरेशनच्या कनिष्ठ विश्व पुरूष आणि महिलांच्या वेटलिफ्ंिटग स्पर्धेसाठी भारताच्या आठ सदस्यांच्या वेटलिफ्ंिटग संघाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये सहा महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे.
या स्पर्धेसाठी अखिल भारतीय वेटलिफ्ंिटग फेडरेशनने निवडलेल्या आठ सदस्यांच्या वेटलिफ्ंिटग संघाबरोबर चार प्रशिक्षक आणि एक व्यवस्थापक आणि एक तांत्रिक व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. या आगामी स्पर्धेकरिता भारताची द्रोणाचार्य पुरस्कार विजेती पंच हंसा शर्माची भारतीय वेटलिफ्ंिटग संघात निवड करण्यात आली आहे. अंजली पटेल आणि हर्षदा गरूड या माहिला वेटलिफ्टर्स 45 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. येत्या सोमवारपासून भारतीय वेटलिफ्टर्सच्या मोहिमेला प्रारंभ होईल. गेल्या कनिष्ठ विश्व वेटलिफ्टींग चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारताच्या अंचिता शेऊलीने 73 किलो वजनगटात रौप्यपदक मिळविले होते.
भारतीय वेटलिफ्ंिटग संघ-महिला- अंजली पटेल (45 किलो), हर्षदा गरूड (45 किलो), ज्ञानेश्वरी यादव (49 किलो), व्ही रितिका (49 किलो), शरबानी दास (55 किलो), एम. मार्टिना देवी (87 किलोवरील)
पुरूष- टी. माधवन (61 किलो), मुना नायक (61 किलो).