वृत्तसंस्था/ सांतियागो
सध्या भारताचा कनि÷ महिला हॉकी संघ चिलीच्या दौऱयावर असून या दौऱयात भारतीय संघ चिलीबरोबर काही सामने खेळत आहे. या दौऱयातील गुरुवारी झालेल्या चौथ्या सामन्यात भारतीय कनि÷ महिला हॉकी संघाने चिलीच्या वरि÷ महिला हॉकी संघाला 2-2 असे गोलबरोबरीत रोखले.
गुरुवारच्या सामन्यात भारतीय संघातर्फे 40 व्या मिनिटाला दिपिकाने तर 55 व्या मिनिटाला गगनदीप कौरने गोल नोंदविले. या सामन्यात चिलीच्या वरि÷ महिला हॉकी संघाने दोन वेळा भारतावर आघाडी मिळविली होती. चिली संघातर्फे मारियाना डेल लागोसने 21 व्या मिनिटाला तर एफ. व्हिलीग्रेनने 51 व्या मिनिटाला गोल नोंदविले. आता या दौऱयात भारताचा कनि÷ महिला हॉकी संघ चिलीच्या वरि÷ महिला हॉकी संघाबरोबर शनिवारी आणि रविवारी असे दोन पाठोपाठ सामने खेळणार आहे. भारतीय कनि÷ महिला हॉकी संघाने या दौऱयात आतापर्यंत 3 सामने जिंकले आहेत.