मुंबई : पेमेंट क्षेत्रात कार्यरत ‘भारत पे’चे चीफ बिझनेस ऑफिसर प्रतीक अगरवाल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी निशांत जैन यांची नियुक्ती करण्यात आलीय. नव्याने रुजू झालेल्या निशांत जैन यांनी मागच्या महिन्यातच झोमॅटोत चीफ सेल्स ऑफिसरपद सोडले होते.
राजीनामा दिलेले अगरवाल आधी एफटी कॅश या छोटय़ा स्टार्टअपमध्ये होते. ते सोडून वर्षापूर्वी भारत पेमध्ये ते दाखल झाले होते.