ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यात भारत-बांग्लादेशच्या सीमेवर ‘फेन्सेडाईल’ या कफ सिरपच्या 194 बाटल्या पकडण्यात आल्या. हे सिरप बांग्लादेशात मादक पदार्थ म्हणून विकले जाते. बीएसएफच्या जवानांनी ही कारवाई केली.
सुरक्षा दलाचे प्रवक्ते राबी रंजन याविषयी म्हणाले, पश्चिम बंगालमधील माल्दा जिल्ह्यात भारत-बांगलादेशच्या सीमेवर गस्त घालत असताना बीएसएफच्या जवानांना आंतरराष्ट्रीय सीमेजवळ संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यावेळी जवानांनी या 8 ते 10 जणांना हटकले. मात्र, या तस्करांनीच जवानांना तीक्ष्ण हत्यारांची भीती दाखवून घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जवानांनी प्रसंगावधान राखत हवेत गोळीबार केला. त्याचवळी तस्करांनी जवळील माल टाकून पलायन केले.
मात्र, एका तस्कराला बीएसएफच्या जवानांनी पकडून फेन्सेडाईलच्या 194 बाटल्यांसह त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.