ओटवणे / प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मोहीमेअंतर्गत भालावल गावात शेतीच्या बांधावर गिरीपुष्पच्या लागवडीसह गादीवाफ्यावर बियाणे पेरणी आणि भात बियाणावर थायरमची बीजप्रक्रिया करण्याबाबत प्रात्याक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मेत्रे, प्रकल्प संचालक आत्मा घोलप, तालुका कृषी अधिकारी माधुरी मुटके, मंडळ कृषी अधिकारी पापडे, कृषी सहाय्यक विश्वनाथ शिवपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. भालावल येथील प्रगतशिल शेतकरी लउ परब व वामन वासुदेव परब यांच्या शेतावर या प्रात्याक्षिकासह सविस्तर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.