वाळपई / प्रतिनिधी
भिरोंडा पंचायत क्षेत्रातील भिरोंडा गावातील जेरॉम फर्नांडिस यांच्या गोठय़ातील 10 दुभत्या गाई गुदमरुन मरण्याचा प्रकार घडलेला आहे. यामुळे भागांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकार शुक्रवारी पहाटे घडला. यामुळे या कुटुंबासमोर अडचणी निर्माण झालेले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, गुरुवारी रात्री पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात वाढली. जेरॉम फर्नांडिस यांच्या घराच्या बाजूलाच असलेल्या वाडय़ात पाण्याचा शिरकाव झाला व गोठय़ामध्ये बांधण्यात आलेल्या दहा दुभत्या गाई गुदमरून मृत्यूमुखी पडल्या.
यासंदर्भात जेरॉम फर्नांडिस यांनी सांगितले की, कुटुंबाला मोठा बसला आहे. गोठय़ामध्ये पाण्याचा शिरकाव कधी झाला हे समजले नाही. ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी बराच वेळ झाला होता. घरामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी घुसले व सामानाची बऱयाच प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सदर गाई या कुटुंबासाठी आधार होत्या.