वार्ताहर / भिलवडी
खंडोबाचीवाडी ता. पलूस येथील लहू रामचंद्र शिंदे यांच्या राहत्या घरी पंन्नास हजाराची चोरी झाली होती. या बाबत भिलवडी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद लहू रामचंद्र शिंदे यांनी दिली होती . भिलवडी पोलीसांनी चोरीच्या गुन्ह्याचा तपास जलद गतीने करुन संशियत सराईत चोरटयास राजेंद्र गणपती केदार वय ३८ वर्ष रा.डोणज ता. मंगळवेढा जि.सोलापुर यास गुहापुर ता. जत या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.
या बाबत भिलवडी पोलीसांनी दिलेली माहीती आशी कि, यातील संशियत अटक आरोपी राजेंद्र गणपती केदार याने खंडोबाचीवाडी येथील लहू रामचंद्र शिंदे यांचे राहते घरी घराचा दरवाजाचे कुलुप काढून घरातील टेबलवरती असले बॅगमधील रोख रुपये ५०,००० असे चोरी करुन घेवून गेला होता त्याप्रमाणे या बाबत भिलवडी पोलीस ठाणेकडे सीसीटीएनएस गुरंन ३४/२०२२ भादविकसक ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल होता . या गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनिषा दुबुले पोलीस उपअधिक्षक अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी तासगांव
यांचे मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस ठाणेचे सहा पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस अंमलदार माणिक मोरे, शिवाजी कोकाटे, तानाजी देवकुळे, गणेश चव्हाण, महेश घस्ते, विशाल पांगे, कॅप्टन गुंडवाडे, प्रकाश पाटील यांचे पथकाने गोपनीय माहीतीच्या आधारे व तांत्रीक माहीतीच्या आधारे करुन यातील आरोपी राजेंद्र गणपती केदार वय ३८ वर्ष रा.डोणज ता. मंगळवेढा जि.सोलापुर यास गुहापुर ता. जत या ठिकाणाहून ताब्यात घेवून त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने वरील सर्व गुन्हयाची कबुली दिली आहे.व सदरचे गुन्हयातील चोरीस गेला मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. सदरील आरोपी याने उमदी पोलीस ठाणेकडील बलात्काराच्या गुन्हयात १० वर्ष शिक्षा भोगलेली आहे . त्याचबरोबर राजवाडा पोलीस ठाणे घरफोडी गुन्हयामध्ये ४ वर्ष शिक्षा शिक्षा भोगलेली आहे.