वृत्तसंस्था/ भुवनेश्वर (ओडिशा)
21 आणि 24 मे रोजी होणाऱया इंडियन ग्रां प्रि 3 आणि इंडियन ग्रां प्रि 4 या स्पर्धांचे यजमानपद भुवनेश्वर भूषविणार आहे. यापूर्वी या ग्रां प्रि स्पर्धा मदुराईमध्ये घेतल्या जाणार होत्या पण ऍथलीट्ससाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यास मदुराईने असमर्थता दर्शविल्याने आता या स्पर्धा भुवनेश्वरमध्ये होणार आहेत.
क्रीडा युवजन ओडिशा शासनाचे अधिकारी तसेच ओडिशा शासनाच्या अधिकाऱयांच्या झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. ओडिशा शासन तसेच अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशन आणि ओडिशा ऍथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन ग्रां प्रि स्पर्धा भरविल्या जाणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये 17 क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. महिलांसाठी 9 तर पुरूषांसाठी 8 क्रीडाप्रकार राहतील.