ज्यांची कोरोना टेस्ट नाही त्यांचे दुकान बंद
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता स्वतः हॉकर्स आणि येणाऱया ग्राहकांची सुरक्षीत म्हणून मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिलेल्या सुचनेनुसार सर्व हॉकर्सधारक कोरोना टेस्ट करुन घेत आहेत. त्या करिता सोमवारी सेव्हन स्टार इमारतीच्या आवारात कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यांनी टेस्ट केलेली नाही त्यांचे दुकान बुधवारी बंद ठेवण्यात येईल, असा निर्धार हॉकर्स संघटनेने घेतला आहे.
शहरातील वाढत चाललेल्या कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहेत. त्यातच शहरातील किरकोळ विक्रेत्यांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे, असा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिलेल्या सुचनेनुसार व आरोग्य विभागाच्या पथकाकडून सेव्हन स्टार इमारतीच्या परिसरात आज कोरोनाची तपासणी करण्यात आली. हॉकर्सने आपले स्वॉब दिले आहेत. प्रत्येक हॉकर्सधारकांनी आपले स्वॉब द्यावेत. जे हॉकर्स स्वॉब देणार नाहीत. त्यांचे दुकान बुधवारी सुरु ठेवण्यात येणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला आहे. भूविकास बँक ते तहसील कार्यालयादरम्यानचे हॉकर्सधारकांचे स्वाब घेण्यात आले.