ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद झाले आहेत. तर 3 जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जम्मूच्या संरक्षण प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत बहादूर अशी शहीद जवानांची नावे आहेत. ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसरायचे रहिवासी होते, तर शिपाई मनजीत सिंग सिरवेवाला हे पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी होते. शनिवारी नौशेरा सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना भूसुरुंग स्फोट झाला. यात ऋषी कुमार आणि मनजीत बहादूर यांना वीरमरण आले. तर तीन जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.