प्रतिनिधी / साटेली-भेडशी:
केर भेकुर्ली-खडफडे येथील वनविभागाच्या क्षेत्रात बिबटय़ा व गवा रेडय़ाच्या झटापटीत गव्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱयांकडून मिळाली.
भेकुर्ली -खडपडे येथील वनविभागाच्या क्षेत्रात ही घटना घडली. तेथील ग्रामस्थ व वनविभागाच्या म्हणण्यानुसार रात्रीच्यावेळी बिबटय़ा व गवा रेडा यांच्यात मोठी झटापट होऊन बिबटय़ाने गवारेडय़ाला गंभीर दुखापत करीत मृत्यूमुखी केल्याचा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱयांनी व्यक्त केला. गवारेडय़ाला गंभीर स्वरुपाची दुखापत केल्याने गवा रेडय़ाचा जागीच मृत्यू झाला. मृत गवारेडय़ाला पाहिले असता जागोजागी गव्याला मोठय़ा इजा केल्याचे दिसत आहे. मृत गव्यारेडय़ावर वनविभागातर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले.