मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर / कारदगा
प्रथमाचार्य 108 श्री शांतीसागर महाराज यांच्या जन्मभूमी भोज नगरीत व्याख्यान वाचस्पती तपोभूमी प्रणेते 108 श्री प्रज्ञासागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीसागर तपोभूमीमध्ये आदर्श पंचकल्याण महामहोत्सव होत असून या महोत्सव सोहळय़ास दि. 2 रोजी भक्तिमय वातावरणात मान्यवर व श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
प्रारंभी सकाळी गावातून हत्ती, घोडे, रथाबरोबर विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर तपोभूमीमध्ये तपोभूमी प्रणेते प्रज्ञासागर महाराज यांच्या दिव्य सानिध्यात सौधर्म इंद्र व इंद्रायणी रेखाजी व मदनमोहनजी हुमड (बडोदा), मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पहाटे 5 वाजता मंगल वाद्य, घोष, आशीर्वाद मंगल पाठ झाले. त्यानंतर सकाळी 6 वाजता नांदी मंगल, इंद्रप्रति÷ा, आचार्य निमंत्रण, कंकण बंधन, व्रतबंधन, पंचामृत अभिषेक व शांतीधारा असे कार्यक्रम पार पडले. तर 9.35 वाजता मंडपासमोर ध्वजारोहण व मंडपाचे उद्घाटन सौधर्म इंद्र इंद्रायणी रेखाजी व मदनमोहनजी हुमड यांच्या हस्ते करण्यात आले.
दुपारी धर्मसभा, प्रवचन व तपोभूमी प्रणेते 108 श्री प्रज्ञासागर महाराज यांचे आशीर्वादपर व्याख्यान झाले. त्यानंतर शांतिहोम, मृत्तिकासंग्रह, अंकुरारोपण, बिजावाप, पंचकुंभविण्यास, ध्वजपटविहार आदी कार्यक्रम पार पडले. सायंकाळी 7 नंतर संगीत आरती, जाप्य, शास्त्रसभा व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.