वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमधील प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत अव्वल समजल्या जाणाऱया मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे माजी फुटबॉलपटू टोनी डय़ुने यांचे वयाच्या 78 वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. 1968 साली पहिल्यांदा युरोपियन फुटबॉल चषक जिंकणाऱया मँचेस्टर युनायटेड संघात डय़ुने यांचा समावेश होता.
1968 साली झालेल्या युरोपियन फुटबॉल चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात मँचेस्टर युनायटेड संघाने बेनफिकाचा 4-1 अशा गोल फरकाने पराभव केला होता. या सामन्यावेळी डय़ुने यांनी मँचेस्टर युनायटेड संघाचे प्रतिनिधीत्व करताना बचावफळीत महत्त्वाची कामगिरी बजाविली होती. 1960 साली बसबाय बरोबर डय़ुने यांनी करार केला होता. या करारापोटी डय़ुने यांना 6400 डॉलर्सची रक्कम मिळाली होती. त्यानंतर ते ओल्ड ट्रफोर्ड येथे 13 वर्षे स्थायिक झाले होते. त्यांनी या 13 वर्षांच्या कालावधीत बसबाय संघाला दोनवेळा फर्स्ट डिविजन फुटबॉल स्पर्धा जिंकून दिली होती. तसेच 1962-63 दरम्यान त्यांनी मँचेस्टर युनायटेड संघाला एफए चषक फुटबॉल स्पर्धा जिंकून दिली होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यांनी 2 गोल नोंदविले होते. डय़ुने यांनी 535 सामन्यात मँचेस्टर युनायटेडचे प्रतिनिधीत्व केले असून त्यांनी प्रजासत्ताक आयर्लंड संघाचे 33 सामन्यात प्रतिनिधीत्व केले होते. मँचेस्टर युनायटेड क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी डय़ुने यांना श्रद्धांजली वाहिली.