वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबने फ्रान्सच्या राफेल व्हेरेनीबरोबर नुकताच नवा करार केला आहे. प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होत असून मँचेस्टर युनायटेडचा सलामीचा सामना लीड्सविरुद्ध होणार आहे.
फ्रान्सचा फुटबॉलपटू व्हेरेनीबरोबर मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबने चार वर्षांसाठी हा नवा करार केला आहे. आता व्हेरेनी मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळताना 19 क्रमांकाच्या जर्सैचा वापर करणार आहे.