- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरप्रदक्षिणा रद्द
ऑनलाईन टीम / पुणे :
शिवपार्वतीच्या नंदना बाळा जो जो रे…नाव ठेवले गणपती गजवदना बाळा जो जो रे म्हणत बरोबर 12 वाजता पाळणा हलवून अखिल मंडई मंडळात गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात आला. गणेशजन्मानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. शारदा गजाननाचे विलोभनीय रुप डोळ्यात गणेशभक्तांनी आपल्या डोळ्यात साठविले.
सकाळी 7 वाजता उमाकांत कोकाटे आणि सायली कोकाटे हस्ते मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर 8 वाजता गणेशयाग करण्यात आला. यावेळी निर्मला केंढे, सुचेता थोरात, मोनाली मोरे, अनुजा थोरात, साधना मते, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, दादा मोरे,नारायण चांदणे, देविदास बहिरट, सुरज थोरात यावेळी उपस्थित होते.
अण्णा थोरात म्हणाले, अखिल मंडई मंडळामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिकरित्या गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात आला. दरवर्षी होणारी नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.