प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत चालली असल्यामुळे बेळगाव जिह्याला दिलासा मिळू लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या घटत चालली आहे. मंगळवारीही जिह्यामध्ये केवळ 9 जण आढळले असून त्यामध्ये बेळगाव तालुक्मयातील तिघा जणांचा समावेश आहे.
कोरोना गेल्या आठ महिन्यांपासून धुमाकूळ घालत आहे. प्रारंभी तर सर्वांच्याच मनात धडकी निर्माण झाली होती. लॉकडाऊन सारखा पर्याय अवलंबावा लागला. दररोज रुग्णांची संख्या 400 हून अधिक आढळून येत होती. मात्र मागील 20 दिवसांपासून त्यामध्ये बरीच घट झाली असून काही दिवशी तर केवळ 1 ते 2 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे.
मंगळवारी बेळगाव तालुक्मयामध्ये 3, अथणी 1, हुक्केरी, रामदुर्ग व रायबाग प्रत्येकी 2 असे एकूण 9 रुग्ण आढळले आहेत. सध्या एकूण 396 जण सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 340 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र आता मृत्यूचे प्रमाणही अत्यंत कमी झाले असून साऱयांनाच दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता सरकारी हॉस्पिटलमधील ओपीडी विभाग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे साऱयांना आता दिलासा मिळत आहे. असे असले तरी अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव असून मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने याबाबत वारंवार सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचे पालन करणे तितकेच महत्वाचे आहे.