प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली असून गेल्या 24 तासात 3,709 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 8,111 जणांना डिस्चार्ज दिला आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 28,15,029 वर पोहोचली असून यापैकी 26,62,250 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी 139 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यानुसार एकूण मृतांची संख्या 34,164 इतकी झाली आहे. सध्या 1,18,592 बाधितांवर वेगवेगळय़ा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी 1,29,099 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यापैकी 3,709 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बेंगळुरात दिवसभरात 803 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 1,745 जण डिस्चार्ज झाले. याचबरोबर बेळगाव जिल्हय़ात 134, चिक्कमंगळूर 163, मंगळूर 374, हासन 309, कोडगू 161, मंडय़ा 124, म्हैसूर 486, शिमोगा 169, तुमकूर 144 आणि कारवार जिल्हय़ात 114 नवे रुग्ण आढळून आले आहेत.