वकिलांसह कुटुंबीयांना लस मिळाल्याने समाधान
प्रतिनिधी/ बेळगाव
वकीलही कोरोना योद्धेच आहेत. आपला जीव धोक्मयात घालून न्यायालयीन कामकाज करत असतात. त्यामुळे बार असोसिएशन तसेच कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य ऍड. विनय मांगलेकर यांनी वकिलांसाठी लस उपलब्ध व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील वकिलांनाही लस देण्यात आली. मंगळवारी 290 वकिलांनी याचा लाभ घेतला.
लसीचा सर्वत्र तुटवडा जाणवत होता. त्यामुळे अनेक वकील लसीपासून वंचित होते. बेळगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनय मांगलेकर यांनी बार असोसिएशनच्या सदस्यांना लस द्यावी, यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार शुक्रवार दि. 4 रोजी 150 वकिलांना लस उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी 290 वकिलांना लस मिळाली.
बेळगाव न्यायालयात जवळपास 2 हजार वकील कार्यरत आहेत. याचबरोबर इतर कर्मचारीही आहेत. त्या सर्वांना लस देणे गरजेचे आहे. कारण कोरोना काळातही आपला जीव धोक्मयात घालून न्यायालयीन कामकाज करत आहेत. अनेक वकिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा सर्वांनाच लस मिळावी, अशी अपेक्षा आहे.
यावेळी कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य विनय मांगलेकर, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, ज्ये÷ वकील बी. एस. सुलतानपुरे, बार असोसिएशनचे सदस्य कमलेश मायण्णाचे, सदस्य नितीन गंगाई, रमेश गुडोडगी, ऍड. अमृत कोल्हटकर, विश्वनाथ सुलतानपुरे व इतर वकील उपस्थित होते.