मंगळूर/प्रतिनिधी
मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवला असल्याची खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुरुवारी उपहार गृहात काम करणाऱ्या एका कामगाराला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उडुपी जिल्ह्यातील कर्कळा तालुक्यातील रहिवासी असलेल्या वसंत (वय वर्षे ३३) याने एक मजकूर पाठवून विमानतळाचे माजी संचालक एम. आर. वासुदेव यांना बोलावले होते आणि सांगितले की मंगळूर विमानतळावर बुधवारी बॉम्ब ठेवण्यात आला आहे.
वासुदेव यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी विमानतळ संचालक व्ही. व्ही. राव यांना सांगितले. राव यांनी ताबडतोब मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकणी बॉम्ब शोधकपथकाच्या सहाय्याने संपूर्ण विमानतळाची तपासणी केली परंतु त्यांना काहीही सापडले नाही,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.