मंडणगड येथील घटना, दोघांना अटक, छऱयाच्या बंदुकीने केली बिबटय़ाची शिकार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मंडणगड येथील जंगलमय भागात बिबटय़ाची शिकार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आह़े या बिबटय़ाचे कातडे काढून ते विक्रीचा प्रयत्न करणाऱया तरूणाला नवी मुंबई पोलिसांनी खारपाडा टोल नाका येथे सापळा रचून ताब्यात घेतल़े जितेंद्र खोटू पवार उर्फ संजू (31) व सोनू वाघमारे (32, ऱा मंडणगड सार्वजनिक चावडी ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आह़े जिह्यातील बिबटय़ाच्या शिकारीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आह़े
नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र पाटील यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आल़ी नवी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथे बिबटय़ाच्या कातडय़ाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार पोलिसांनी बनावट गिऱहाईक बनून आरोपींशी संपर्क साधल़ा तसेच कातडय़ाची अडीच लाख रूपये देण्याचे मान्य करून खरेदीसाठी पनवेल जवळील खारपाडा टोल प्लाझा येण्याचे सांगितल़े आरोपींना अटक करण्यासाठी नवी मुंबई गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचल़ा
त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी रात्री 9.10 च्या सुमारास पोलिसांना टोल प्लाझाजवळ एक व्यक्ती खांद्यावर बॅग घेऊन येताना दिसली. सुमारे पाच मिनिटे त्याच्या नजरेस पडल्यानंतर पोलिसांना तो संशयास्पद वाटला. पोलिसांचा संशय पक्का झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अचानक झडप घालून त्याला ताब्यात घेतल़े पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यांना पिशवीतून तीव्र वास येत होत़ा यावेळी पोलिसांनी पिशवीची तपासणी केली असा आतमध्ये बिबटय़ाचे कातडे असल्याचे पोलिसांना आढळून आल़े
त्याच्याविरुद्ध पनवेल तालुका पोलिस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 च्या कलम 9 (1), 49 आणि 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बेकायदेशीर बाजारात कातडीची किंमत सुमारे अडीच लाख रूपये असल्याचे सांगण्यात आल़े भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा (1972) च्या शेडय़ूल 1 मध्ये बिबटय़ाची नोंद आहे आणि आरोपीविरूद्ध गुन्हा शाबीत झाल्यास जास्तीत जास्त सात वर्षांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावला जाईल, असे वन अधिकाऱयांनी सांगितले.
चार महिन्यांपूर्वी छऱयाच्या बंदुकीने बिबटय़ाची शिकार
संशयित आरोपींनी मंडणगड गावी चार महिन्यांपूर्वी जंगलामध्ये शिकारीसाठी जाळे लावले होत़े हे जाळे त्यांनी रानडुकराच्या शिकारीसाठी लावले होत़े मात्र या जाळ्यात बिबटय़ा अडकला होत़ा संशयितांना बिबटय़ा अडकल्याचे समजताच त्यांनी छऱयाच्या बंदुकीने त्याची शिकार केल़ी तसेच बिबटय़ाचे कातडे काढून घेतले असे पोलिसांच्या तपासात समोर आले आह़े